Skip to main content
Date

 भाजपने 606.64 कोटी रुपये फक्त निवडणूक आणि प्रचार अभियानावर खर्च केले.

- कांग्रेसच्या उत्पन्नापेक्षा तीनपट अधिक भाजपचा प्रचारावरील खर्च आहे.

नवी दिल्ली -भारतीय जनता पार्टी आता 1000 कोटींची पार्टी बनली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या रिपोर्टनुसार सात राष्ट्रीय पक्षांनी फायनांशिअल इयर 2016-17 मध्ये मिळालेल्या देणगीचा आकडा जाहीर केला. हा एकूण आकडा 1559 कोटी एवढा समोर आला आहे. त्यात सर्वाधिक देणगी भाजपला मिळाली आहे. त्यानंतर क्रमांक लागतो काँग्रेसचा. भाजपची देणगीची रक्कम 81.8% वाढून 1034 कोटी झाली आहे. 2015-16 मध्ये हा आकडा 570.86 कोटी रुपये होता. तर या दरम्यान, काँग्रेसच्या पक्षनिधीत 14% घट झाली आहे. पक्षाला मिळालेल्या देणगीचा आकडा 261.56 कोटीहून 225.36 कोटीवर आला आहे.

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपा वगळता इतर पक्षांचा निधी घटला

पक्ष उत्पन्न (2016-17) उत्पन्न(2015-16)
भाजप 1034.27 570.86 कोटी
काँग्रेस 225.36 261.56 कोटी
बसप 173.58 47.35 कोटी
माकप 100.25 107.25 कोटी

राष्ट्रवादी काँग्रेस

17.23 9.13 कोटी
तृणमूल काँग्रेस 6.39 34.57 कोटी
भाकप

2.07

2.17 कोटी

भाजपला सर्वाधिक उत्पन्न देणगीतून
- भाजप आणि काँग्रेसने उत्पन्नाचे स्त्रोतही सांगितले. त्यात देणगीसह इतर काही बाबींचा समावेश आहे. 
- भाजपने सांगितले की, त्यांना देणगीच्या रुपात 997.12 कोटी रुपये मिळाले. हा आकडा 2016-17 या आर्थिक वर्षाच्या एकूण उत्पन्नाच्या 96.41% आहे. तर काँग्रेसला या माध्यमातून 115.66 कोटी रुपये मिळाले आहेत. म्हणजे उत्पन्नाच्या 51.32%.

कुठून किती उत्पन्न?

पक्ष स्वेच्छा निधी बँकेकडून मिळालेले व्याज फी, सदस्य नोंदणी
बीजेपी 997.12 करोड़ 31.18 करोड़ 4.29 करोड़
कांग्रेस 115.664 करोड़ 50.626 43.89

भाजपने 606.64 कोटी खर्च केले प्रचारावर
भाजपने 2016-17 मध्ये 606.64 कोटी रुपये निवडणूक आणि प्रचारावर खर्च केले. तर प्रशासकीय कामांवर 69.78 रुपये खर्च केले. काँग्रेसने निवडणुकीत 149.65 कोटी आणि प्रशासकीय कामांवर 115.65 कोटी रुपये खर्च केले. त्यानंतर क्रमांक लागतो बसपाचा. मायावतींच्या या पक्षाने निवडणूक प्रचारात 40.97 कोटी खर्च केले. तर प्रशासकीय आणि इतर कामात 10.809 कोटी खर्च केले.


abc