महाराष्ट्रातील 284 आमदारांची (India MLA) सरासरी संपत्ती 23.51 कोटी रुपये असल्याचे त्यांच्या निवडणूक स्वयंघोषणापत्रकातून स्पष्ट झाले आहे. कर्नाटकातील आमदारांची सरासरी संपत्ती 64.39 कोटी रुपये आहे. देशातील सर्व आमदारांची सरासरी संपत्ती ही 13.63 कोटी रुपये आहे. असोसिएशन फॉर डेमोक‘ॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) आमदारांच्या घोषणापत्रकाचे विश्लेषण केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. देशभरातील राज्य विधानसभांमधील प्रत्येक आमदार सरासरी 13.63 कोटींचा मालक आहे. फौजदारी खटले दाखल नसलेल्या (India MLA) आमदारांची सरासरी मालमत्ता 11.45 कोटी रुपयांच्या तुलनेत, घोषित गुन्हेगारी प्रकरणे असलेल्या आमदारांची सरासरी मालमत्ता 16.36 कोटी रुपये आहे.