संसदेच्या 763 पैकी 306 म्हणजे 40 टक्के Crimes against MPs खासदारांवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे एक अहवालातून स्पष्ट झाले आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्मस (एडीआर) आणि नॅशनल इलेक्शन वॉच (एनईडब्ल्यू) या दोन संस्थांनी जारी केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. आपल्यावर असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांची कबुली संसदेच्या 763 पैकी 306 खासदारांनी प्रतिज्ञापत्रातून दिली आहे. खासदारांनी 2019 मध्ये झालेल्या लोकसभा तसेच त्यानंतर वेळोवेळी झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती मिळाली असल्याचे एडीआर आणि नॅशनल इलेक्शन वॉच (एनईडब्ल्यू) या दोन संस्थांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आपल्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि महिलाविषयक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे 194 म्हणजे जवळपास 25 टक्के खासदारांनी म्हटले आहे. दोषी खासदारांमध्ये केरळ आघाडीवर आहे. त्यानंतर बिहार, महाराष्ट्र आणि तेलंगणातील खासदारांची सं‘या आहे. भाजपाच्या 385 पैकी 139 म्हणजे 36 टक्के, काँग्रेसचे 81 पैकी 43 म्हणजे 53 टक्के, तृणमूल काँग्रेसचे 36 पैकी म्हणजे 14 म्हणजे 39 टक्के, वायएसआर काँग्रेसचे 31 पैकी 13 म्हणजे 42 टक्के, आपचे 11 पैकी 3 म्हणजे 27 टक्के तर माकपच्या 8 पैकी 6 म्हणजे 75 टक्के खासदार कलंकित आहेत. राष्ट्रवादी काँग‘ेसच्या 8, राजदच्या 6 खासदारांवरही गुन्ह्यांची नोंद आहे. लोकसभा तसेच राज्यसभेच्या खासदारांची सरासरी संपत्ती 38.33 कोटी तर, गुन्हे दाखल असलेल्या खासदारांची सरासरी संपत्ती 50 .3 कोटी रुपये आहे. एकही Crimes against MPs गुन्हा दाखल नसलेल्या खासदारांची सरासरी संपत्ती 30 .50 कोटी रुपये आहे.