Eknath Shinde News : असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स संस्थेचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे.
ADR Report News : असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) संस्थेचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात देशातील मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीबाबत खुलासा करण्यात आला आहे. संस्थेने आपल्या अहवालात निवडणुकीतील हमीपत्रातील माहितीनुसार देशातील 30 पैकी 29 मुख्यमंत्री कोट्याधीश असल्याचे म्हणटले आहे.
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्याकडे सर्वाधिक म्हणजे 510 कोटींची संपत्ती आहे. या यादीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सर्वात गरीब मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे फक्त 15 लाख रुपयांची संपत्ती आहे. एडीआरने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व 30 मुख्यमंत्र्यांच्या शपथपत्रांचे विश्लेषण केले. विश्लेषणात 30 मुख्यमंत्र्यांपैकी 29 करोडपती आहेत. ज्यांची सरासरी संपत्ती 33. 96 कोटी रुपये प्रति व्यक्ति आहे.
या अहवाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनात शिंदे (Eknath Shinde) चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे 11 कोटी, 56 लाख 12 हजार रुपयांची संपत्ती असल्याचे अहवालात म्हटले आहे. सर्वाधिक देणे असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत शिंदे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. संपत्तीच्याबाबतीत प्रथम तीन मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर जगनमोहन रेड्डी (510), दुसऱ्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू (163 कोटी) तर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (63 कोटी) तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
बॅनर्जी यांच्याकडे 15 लाख रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडे 1 कोटींपेक्षा जास्त तर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे सुद्दा 1 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता आहे. अहवालानुसार बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या दोघांकडेही 3 कोटींची संपत्ती आहे.