राज्यसभेच्या विद्यमान खासदारांपैकी १२ टक्के सदस्य अब्जाधीश असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने केलेल्या विश्लेषणातून पुढे आली आहे. यामध्ये दक्षिणेतील आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांतील सदस्या आघाडीवर असल्याची बाबही समोर आली आहे.
‘एडीआर’बरोबरच आणि नॅशनल इलेक्शन वॉच (एनईडब्ल्यू) या संस्थांच्या वतीने राज्यसभेतील २३३ निर्वाचित सदस्यांपैकी २२५ सदस्यांचे त्यांच्यावरील दाखल गुन्हेगारी खटले व सांपत्तिक स्थिती या संदर्भात विश्लेषण करण्यात आले होते.
यूपीतील खासदार तुलनात्मक गरीब
या विश्लेषणानुसार, तेलंगणातील सात खासदारांची एकूण संपत्ती ही ५,५९६ कोटी इतकी आहे. आंध्र प्रदेशातील ११ खासदारांची संपत्ती ३,८२३ कोटी आहे. उलटपक्षी, उत्तर प्रदेशातील ३० खासदारांची एकूण संपत्ती ही १,९४१ कोटी इतकी असल्याचे पुढे आले आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी
राज्यसभेतील ७५ (३३ टक्के ) खासदारांनी दाखल असलेले खटले संसदेला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहेत.
यामध्ये ४१ (१८ टक्के) खासदारांनी गंभीर फौजदारी खटल्यांची नोंद केली आहे.
चार सदस्यांनी महिला अत्याचारविषयक खटल्यांचीही नोंद केली आहे.
राज्यनिहाय अब्जाधीश खासदार
राज्य -खासदार -अब्जाधीश -टक्केवारी
आंध्र प्रदेश- ११- ५ -४५
तेलंगण -७- ३ -४३
महाराष्ट्र -१९ -३- १६
दिल्ली -३ -१- ३३
पंजाब -७- २ -२९
हरियाना -५ -१- २०
मध्य प्रदेश -११- २ -१८
गुन्हेगारी खटले जाहीर केलेले खासदार (पक्षनिहाय)
पक्ष -एकूण खासदार- खटले असणारे - टक्केवारी
भाजप- ८५ -२३- २७
काँग्रेस -३० -१२- ४०
तृणमूल काँग्रेस -१३- ४- ३१
राजद -६- ५- ८३
माकप -५- ४- ८०
आप -१० -३ -३०
वायएसआर काँग्रेस- ९ -३- ३३
राष्ट्रवादी काँग्रेस- ३ -२- ६७