Poor Chief Minister : सर्वात गरीब मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जींचे नाव आले पुढे..
Poor Chief Minister : देशातील विविध राज्यांचे एकूण तीस मुख्यमंत्र्यांचा संपत्तीचा आढावा नुकताच घेण्यात आला. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्री आहेत. ममता बॅनर्जी यांच्याकडे निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार केवळ 15 लाखांची संपत्ती आहे.
यानंतर केरळ राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची 1 कोटीहूनअधिक संपत्ती आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल कट्टर, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दिल्लीचे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) या तिन्ही मुख्यमंत्र्यांची ३ कोटी रुपयांची संपत्ती आहे, असे अहवालात म्हटले आहे.
निवडणूक आयोगाकडील उमेदवारीबाबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार देशातील 30 विद्यमान मुख्यमंत्र्यांपैकी 29 मुख्यमंत्र्यांकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे देशातील सर्वात श्रीमंत आहेत. रेड्डी यांच्याकडे 510 कोटींची संपत्ती आहे.
या संस्थेच्या जाहीर केलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे केवळ पंधरा लाख एवढी संपत्ती आहे. त्या सद्यस्थितीत देशातील सर्वात गरीब असलेलल्या मुख्यमंत्री आहेत. एडीआरने सांगितले की, देशातील विविध राज्ये व केंद्रशासित राज्यांचे सर्व सध्याचे तीस मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीबाबत माहिती घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांचा धांडोळा घेतल्यानंतर त्यांनी हा अहवाल तयार केला आहे.
या माहितीनुसार 30 मुख्यमंत्र्यांपैकी 29 कोट्याधीस आहेत. मुख्यमत्र्यांची सरासरी मालमत्ता तेहतीस कोटी रूपयांच्या घरात आहे. 30 मुख्यमंत्र्यांपैकी 13 जणांवर वर खून, हत्येचा प्रयत्न, अपहरण आणि गुन्हेगारी धमकी यासह इतरही गंभीर गुन्हेगारी प्रकरणे आहेत, घोषित करण्यात आले आहेत. गंभीर गुन्हेगारीतील प्रकरणे हे अजामीनपात्र गुन्हे आहेत, ज्यात पाच वर्षांपेक्षा जास्त कारावास आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
या अहवालानुसार, आंध्र प्रदेशचे जगन मोहन रेड्डी यांची संपत्ती ५१० कोटी्ंहून अधिक आहे. तर दुसऱ्या क्रंमांकावर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आहेत. त्यांची संपत्ती १६३ कोटींहून अधिक आहे. यानंतरचा क्रमांक ओडिशाचे राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची संपत्ती ६३ कोटींपेक्षा अधिक आहे. पहिल्या तीन क्रमांकावर या मुख्यमंत्र्यांची नावे आहेत.