Skip to main content
Source
महाराष्ट्र टाइम्स
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-7289286,prtpage-1.cms
Author
म. टा. प्रतिनिधी
Date

निवडणूक प्रक्रिया सुधारण्यासाठी नागरिक संघटनांच्या सूचना

बलात्कार, खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे नांेदविण्यात आलेल्या व्यक्तींना निवडणूक लढविण्यास प्रतिबंध करणे, उमेदवाराचे आथिर्क उत्पन्न जाहीर करणे, निवडणूक आयुक्तांची नियुक्ती, बहुपक्षीय पद्धती अवलंबणे आदी निवडणूक व्यवस्थेत बदल सुचविणाऱ्या सूचना नॅशनल इलेक्शन वॉच (न्यू) आणि असोसिएशन फॉर डेमॉक्रेटीक रिफॉर्म (एडीआर) या नागरिकांच्या संघटनेतफेर् करण्यात आल्या आहेत.

भारतीय निवडणूक पद्धतीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने केंदीय विधी आणि न्याय विभाग निवडणूक आयोगाच्या मदतीने सूचना मागवित आहे. मुंबईत १६ जानेवारीला या संबंधात बैठक होणार असून न्यू आणि एडीआर या संघटनांतफेर् सूचनांचा मसुदा देण्यात येणार आहे. त्यात दोन किंवा त्याहून अधिक वर्षांची शिक्षा होऊ शकणाऱ्या गुन्ह््याखाली खटला सुरू असणाऱ्या व्यक्तींना निवडणूक लढविण्यापासून मज्जाव करण्यात यावा, अशी प्रमुख सूचना करण्यात आली आहे. राजकारणाचे गुन्हेकारीकरण रोखण्यासाठी हे आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

जात, धर्म, भाषा आदी मुद्द्यांच्या आधारे केले जाणारे राजकारण रोखण्यासाठी एखाद्या उमेदवाराला विजयी म्हणून घोषित करण्यासाठी एकूण मतदानापैकी किमान ५० टक्के अधिक एक मत मिळविणे बंधनकारक असले पाहिजे. अन्यथा त्या विभागात नव्याने निवडणुका घेण्यात याव्या, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवडणूक काळात प्रचारावर होणाऱ्या खर्चावर मर्यादा टाकणे, यापैकी कुणीही नाही, हा पर्याय मतदाराला उपलब्ध करून देणे, आदी मागण्याही यात करण्यात आल्या आहेत. तसेच जो उमेदवार आपला निवडणुकीचा खर्च सादर करणार नाही त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाण्याची मागणीही करण्यात आली आहे.